सुरत – काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरातमधील सूरत येथील दंडाधिकारी कोर्टात हजर झाले आहेत. मोदी आडनावावरुन राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. भाजपा आमदाराने हा खटला दाखल केला असून याचप्रकरणी राहुल गांधी जबाब नोंदण्यासाठी कोर्टात हजर झाले आहेत.
भाजपा आमदार पुर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या खटल्यावरील सुनावणीदरम्यान सूरतच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्यांचा अंतिम जबाब नोंदवण्याचा आदेश दिला होता. दरम्यान कोर्टात हजर होण्याच्या काही तास आधी राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी, “अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य कोणतीही भीती न बाळगणे आहे”, असं म्हटलं होतं.
Gujarat: Congress leader Rahul Gandhi arrives at Surat court to defend himself in a criminal defamation case over the ‘Modi surname’ remark pic.twitter.com/odl2eynsVT
— ANI (@ANI) June 24, 2021
पुर्णेश मोदी यांनी एप्रिल २०१९ मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, राहुल गांधी निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी करत आहेत. राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ मध्ये कर्नाटकमधील सभेत केलेल्य्या वक्तव्याच्या आधारे ही तक्रार करण्यात आली होती.






