इंदिरा गांधी यांच्यावर आधारित एका पॉलिटिकल चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत झळकणार

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री कंगना रणौत सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. येत्या काळात ‘धाकड’ तसचं ‘तेजस’ सह अनेक सिनेमांमध्ये कंगना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकणार आहे. प्रत्येक भूमिकेसाठी कंगना कायमच मोठी मेहनत घेताना दिसते. यातच आता कंगना लवकरच इंदिरा गांधी यांच्यावर आधारित एका पॉलिटिकल ड्रामात झळकणार अशा चर्चा होत्या. या सिनेमाबद्दल आता कंगनाने एक अपडेट दिलंय.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात कंगनाने इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी तयारी सुरू झाल्याचं स्पष्ट केलंय. प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयात इंदिरा गांधी यांच्या लूकसाठी कशाप्रकारे बॉडी स्कॅनिंग केलं जातं हे तिने या फोटोच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे.

त्यामुळे येत्या काळात आता थलायवीनंतर कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पुन्हा एकदा एका राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालीय. कॅप्शनमध्ये कंगना म्हणाली, “प्रत्येक भूमिका म्हणजे नव्या प्रवासाची सुंदर सुरूवात असते. आज आम्ही #Emergency #Indira च्या प्रवासाला बॉडी आणि फेस स्कॅनिंगने सुरुवात केली आहे ज्यामुळे अगदी योग्य लूक साधता येईल.”असं ती म्हणाली.

दरम्यान, कंगनाने ती या भूमिकेसाठी खूपच उत्सुक असल्याचं म्हंटलं आहे. कंगना रणौतने याआधीच हा सिनेमा इंदिरा गांधी यांची बायोपिक नसल्याचं स्पष्ट केलंय. या सिनेमाचं दिग्दर्शन साई कबीर करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here