हृतिक रोशनने सोशल मिडीयावर केला ‘क्रिश ४’चा टीझर व्हायरल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेता हृतिक रोशनच्या कारकिर्दीला मोठा आधार देणारा चित्रपट क्रिश चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्या निमित्ताने हृतिकने या सीरिजमधल्या चौथ्या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हृतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर क्रिश ४चा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने ‘भूतकाळात जे घडलं ते घडलं. चला भविष्यात काय घडते ते पाहूया.. क्रिश ४’ या आशयाचे कॅप्शन हृतिकने दिले आहे. त्यासोबतच क्रिशला १५ वर्षे पूर्ण झाल्याने #15yearsofkrrish असे त्याने म्हटले आहे.

२००३ साली आलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचा ‘क्रिश ४’ चौथा भाग असणार आहे. हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट खूपच गाजला. त्यानंतर हृतिक रोशन पुढच्या भागांत सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला. ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अनुक्रमे २००६ आणि २०१३ मध्ये हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या तिन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘क्रिश ४’ येणार असल्याचाही माहिती निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांनी दिली होती. आता ‘क्रिश ४’चा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here