मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – सैराट या चित्रपटाने प्रसिध्द झालेली अभिनेत्री रिंकू चाहत्यांकरिता खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे.असे असले तरीही रींकूचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. सामान्य आयुष्यच जगणे पसंत करते.
नुकत्याच इस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमधून याच गोष्टीची प्रचिती येते. पहिल्याच सिनेमातून मिळालेल्या यशाने हुरुळून न जाता रिंकूचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये.ती जे काही करते ते खासच असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्गही आहे. मात्र तुमच्या लाडक्या आर्चीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हटके काम करण्यात ती व्यस्त दिसते. रिंकूचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तिचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
मिळालेल्या वेळेत रिंकू शेतात काम करताना दिसते. तसेच चाहत्यांनाही तिने झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल हे मात्र नक्की. निसर्गाच्या सानिध्यात राहायला प्रत्येकाला आवडते. त्यामुळेच अकलूजमध्ये रिंकूच्या घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. नारळ, आंबा, पेरु आणि वेगवेगळ्या फुलांची भरपूर झाडं आहेत. रिंकूला चित्रकलेचीही आवड आहे. त्यामुळे तिच्या घराच्या भीतींवरही तिने अनेक रेखाटलेले चित्र लावल्याचे पाहायला मिळते. मनमौजी अशी रिंकू आहे. नेहमीच आनंदात आणि हसतमुख राहणारी रिंकूचे आज जगभरात चाहते आहेत.






