अक्षय कुमार-नुपुर सेननचं ‘फिलहाल 2’ गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेननची बहिण नुपुर सेनन यांचं ‘फिलहाल’ हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. त्यानंतर गाण्याचा दुसरा पार्ट येणार आहे. मेकर्स हे गाणं ‘फिलहाल २’ या नावाने रिलीज करणार आहेत. याबाबत स्वतः अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिलीय. नुकतंच अक्षय कुमारने या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज केलाय. तसंच गाण्याचा टीझर सुद्धा लवकरच रिलीज करण्यात येईल, असं सांगितलंय.

अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘फिलहाल २’ या गाण्याचं पोस्टर शेअर केलंय. सोबत त्याने कॅप्शन देखील लिहिलीय. “वेदना अजुनही सुरूच…जर ‘फिलहाल’ने तुमचं मन जिंकलंय तर ‘फिलहाल २’चं प्रेम तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल…सादर करत आहोत या गाण्याचा फर्स्ट लूक…या गाण्याचा टीझर ३० जून रोजी रिलीज करण्यात येईल…कायम आमच्या बरोबर रहा !”

‘फिलहाल’ या पहिल्या पार्टच्या गाण्यात दोन प्रेमींची कहाणी दाखवण्यात आली होती. यात दोघेही एकमेकांवर प्रेम करतात परंतु त्यांचं लग्न दुसऱ्याच कुणासोबत होतं, असं दाखवण्यात आलंय. पहिल्या पार्टमध्ये अभिनेता अक्षय कुमार डॉक्टरच्या भूमिकेत असतो तर नुपुर त्याची पेशंट असल्याचं दाखवलंय. या गाण्याची जादू आजही प्रेक्षकांवर मनावर आहे. त्यामूळे आता या गाण्याचा दुसरा पार्ट सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकण्यात किती यशस्वी होतोय, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here