वटपौर्णिमेला भाजपा सिडको मंडल 2 च्या वतीने नंदिनी नदीच्या तीरावर वृक्षारोपण

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – गुरुवार, दि.२४ जून दुपारी ३ ते ५ या वेळेत वटपौर्णिमेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिडको मंडल 2 च्या वतीने आपल्या नंदिनी नदीच्या तीरावर वृक्षारोपण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी यापुढे आम्ही नदीत कचरा टाकणार नाही व इतर कुणाला कचरा टाकू देणार नाही. आम्ही तुला प्रदूषणमुक्त करू व नदीपात्र स्वच्छ ठेवू.. असा संकल्प केला. त्याचबरोबर चला.. नंदिनी नदी पुनरुज्जीवन व संवर्धन अभियानात सहभागी होऊ व जागरूक नाशिककर असल्याचा अभिमान जागवू…! अशा शपथेने नंदिनी नदीतीरावर महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

nashik-bjp-vatpurnima

यावेळी आमदार सीमाताई हिरे मण्डल अध्यक्ष अविनाश पाटील, राकेश ढोमसे, अलका अहिरे ,भाग्यश्री ढोमसे, सौ.प्रतिभा पवार, कैलास अहिरे, भुवाल सिंग उखा चौधरी डॉ सनासे दिनेश मोडक अशोक पवार आबा पवार , वैभव महाले कारभारी देवरे मकरन वाघ सुरेश गांगुर्डे महेंद्र पाटील जितेंद्र रनाळकर संजय गुंजाळ बंडू जाधव प्रशांत मेने सुनील बेलदार वसंत गोसावी राजेंद्र फड विद्या शेळके दिनेश अहिरे आदित्य दोंदे किरण गाडे विद्या चौधरी अपर्णा शोत्री आदींसह अनेक महिला महिला व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here