अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – दहिटणे ता.अक्कलकोट येथील वार्ड क्रमांक-३ मधील अंगणवाडी क्रमांक २६० मध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दहिटणे गावचे सुपुत्र तथा हंजगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरुण पोपसभट सर यांच्याहस्ते अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे याचे महत्व जाणून पोपसभट सर यांनी वृक्षारोपण करण्यासाठी अंगणवाडीस भेट स्वरुपात विविध प्रकारचे रोप उपलब्ध करुन दिले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रमेश स्वामी सर ग्रामविकास अधिकारी एस.जी.वंगे साहेब अंगणवाडी सेविका व मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.अंगणवाडी क्रमांक २६० च्या सेविका खुने मॕडम यांनी पोपसभट सर व उपस्थितांचे आभार मानले.






