जळगाव येथे वेब मिडिया असोसिएशन मुंबईच्या विशेष बैठकीचे आयोजन

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – जळगाव येथे वेब मिडिया असोसिएशन मुंबईच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, वेब मिडीया असोसिएशनमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणारे जळगाव जिल्ह्यातील सर्व संपादक व पत्रकार यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन वेबमिडीया असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

वेब मीडिया असोसिएशन ऑनलाइन मीडियाच्या डिजिटल पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटनेची जळगाव जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यासाठी पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील ऑनलाईन मीडिया पोर्टल चालवणाऱ्या सर्व संपादकांनी व पत्रकारांनी तसेच ज्या वेब मीडियाच्या मालकांना वेब मीडिया असोसिशनमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वेब मिडीया असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष अनिल महाजन हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून वेब मिडीया असोसिएशनचे संचालक सदस्य अयाज मोहसीन खान, अभिजीत पाटील, आनंद शर्मा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

ही बैठक मंगळवार (दि.२९) दुपारी ३ वाजता पद्मालय शासकीय विश्रामगृह जळगाव येथे होणार असून, जिल्ह्यतील सर्व संपादक व पत्रकारांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन वेबमिडीया असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here