जळगाव जिल्ह्यात लेव्हल ३ चे निर्बंध जारी

जळगाव (प्रतिनिधी असलम खान शाहिद खान) – जळगाव जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा रुग्ण आढळून आले असून खबरदारीचे उपाय म्हणून राज्य शासनाकडून राज्यभर लेव्हल 3 चे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून याबाबतचे संकेत मिळाले असून शहरातील सर्व आस्थापना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत,27 जुन पासून सदर नियमावली लागू होईल, अत्यावश्यक दुकाने सकाळी 7ते4 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 सर्व खुले राहतील, मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील,

हॉटेल सोमवार ते शुक्रवार हॉटेल 50 टक्के खुले दुपारी 4 पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल सुरू असेल, सुविधा शनिवार,रविवार बंद राहील,
लोकल आणि रेल्वे बंद राहतील,
मॉर्निंग वोक, मैदाने सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल,
आउड डोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरू असतील,
50 टक्के क्षमतेने खाजगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील, स्टुडिओत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल, मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 4 पर्यंत खुले असणार सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील,
लग्नसोहळा 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थिती राहण्याची मुभा असेल,
बांधकाम दुपारी 4 पर्यन्त सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे,
शेती विषयक सर्व कामे करता येतील,
इकॉमर्स दुपारी 4 पर्यंत सुरू असेल,
जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here