सोहम आयोजित केक मेकिंग, बेकिंग आणि केक आयसिंग ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – वाढदिवस, एखाद्या कुटुंबाचे स्नेहमिलन या सगळ्यांमध्ये जेवणाबरोबरच आवश्यकता असते ती म्हणजे केकची. कारण केक नसेल तर त्या सेलिब्रेशनला मजा नाही. यासाठीच गृहिणींची व सर्वांचीच गरज ओळखून कमीत कमी साहित्यात घरच्या घरी केक बनविता आला तर!

असा हा केक कोणी करायला शिकवला तर ? मग अशीच केक बेकिंग व केक आइसिंग ची प्रशिक्षण कार्यशाळा डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी ,मुंबई यांनी आयोजित केली .

या कार्यशाळेला प्राची पाटणकर प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभल्या होत्या. त्यांनी सगळ्यांचा आवडता केक ब्लॅक फॉरेस्ट, त्यावरील आइसिंग, कुकर मध्ये तसेच ओव्हन मध्ये केक कसा बेक करायचा?, केक करतांना कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता असते ?, केक मऊ कसा होतो? केक बनवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले ब्रँडेड साहित्य कोणते? ते किती प्रमाणात वापरावे? केक बिघडला तर काय करायचे? या आणि अशा अनेक गोष्टींच्या टिप्स रसिक प्रेक्षकांना दिल्या.

या कार्यशाळेसाठी मुंबई, पुणे, बुलढाणा, बेळगाव, कोकण येथून प्रेक्षक सहभागी झाले होते. त्यांनी प्रश्नांच्या माध्यमातून शंकासमाधान झाल्याबद्दल सोहम अकादमीचे आभार मानले. आणि अशी उपयुक्त केक ची कार्यशाळा डॉ. मीनल मॅडमनी आयोजित केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले व आभार मानले. या कार्यशाळेला नेहमीप्रमाणेच गृहिणींचा विशेष प्रतिसाद मिळालाच ,सोबत पुरुषवर्गाची पसंती व सहभाग हेच आजच्या कार्यशाळेचे खास वैशिष्ट्य होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती समीक्षा तावडे यांनी केले तसेच प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्रीमती प्रिया उपासनी यांनी केले. तर तंत्रस्नेही गया मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाची सांगता सर्व प्रशिक्षणार्थी व उपस्थित सर्व खवय्ये यांचे विशेष आभार मानून झाली. सर्व प्रशिक्षणार्थी सुगरणींना सोहम अकादमीतर्फे प्रमाणपत्र व डिजिटल कॅलेंडर भेट देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here