राज्यात गेल्या २४ तासात ८,३८५ रुग्णांची कोरोनावर यशस्वीरित्या मात

राज्यात काल दिवसभरात ८,७५३ नवे कोरोनाबाधित; १५६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या दैनंदिन रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येते आहे. राज्यातील कोरोनाच्या दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. शुक्रवारी राज्यात ८,७५३ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १५६ कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात आज ८,३८५ रुग्ण कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन घरी परतले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसात दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना बाधितांमध्ये आज मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात दिवसभरात ८ हजार ८५३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर राज्यात करोनातून बरे होणाऱ्या संख्येतही मोठी भर पडली आहे. दिवसभरात ८ हजार ३८५ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ३६ हजार ९२० रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आज २५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात १ लाख १६ हजार ८७६ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराधीन आहेत. तर राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या ४ कोटी २० लाख ९६ हजार ५०६ कोरोना चाचण्यांपैकी ६० लाख ७९ हजार ३५२ (१४.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २४ हजार ७४५ करोना बाधित होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ४,४७२ बाधित संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, मुंबईत शुक्रवारी ६७६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ५४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ६ लाख ९७ हजार १४० रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९६% टक्के आहे. मुंबईत एकूण ८५९८ सक्रिय रुग्ण आहेत तर दुप्पटीचा दर ७४४ दिवसांवर गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here