अकोल्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा

तिघांचा जागीच मृत्यू : एक गंभीर जखमी

अकोला (प्रतिनिधी) : अकोला शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. रिधोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रकच्या भीषण अपघात तिघे जण जागीच ठार झाले आहेत. कारमधील अन्य एकजण गंभीर जखम) झाला आहे. रात्री 1 च्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाल्यानं मदत पोहोचायला बराच उशीर झाला. तोपर्यंत अपघातग्रस्त कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला होता.

मध्यरात्री १ च्या सुमारास घडलेला हा अपघात एवढा भयंकर होता की, या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. संबंधित अपघातग्रस्त कारमधून एकूण चारजण प्रवास करत होता. ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून शेगावकडून वाशिमच्या दिशेनं जात होते. दरम्यान रात्री एकच्या सुमारास एका भरधाव ट्रकने मृतांच्या कारला भीषण धडक मारली. या भीषण अपघात कार मधील तिघेजण जागीच ठार झाले, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात इतका भयंकर होता, की या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ज्यामध्ये तीन जणांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. रात्री उशीरा एक जणाला गंभीर अवस्थेत उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मृत सर्वजण वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिमच्या दिशेनं जाताना त्यांच्या कारला हा भीषण अपघात झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here