स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी घेतली साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सदिच्छा भेट

नाशिक (विशेष प्रतिनिधी कुबेर जाधव) : महाराष्ट राज्य साखर कारखान्याचे आयुक्त हे नाशिक दौऱ्यावर असताना व नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रानवड तसेच द्वारकाधीश कारखान्याच्या कामकाजासंदर्भात संपर्क दौऱ्यावर असताना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची शेवरे मांगीतुंगी येथे सदीच्छा भेट घेण्यात आली.

या भेटीच्या वेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांच्याकडून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आजच्या परिस्थिती बाबत माहिती जाणून घेतली. धाराशिव संचलित वसाका संदर्भात आस्थेने चौकशी केली.

kuber-jadhav

 

यावेळी कुबेर जाधव यांनी लिहिलेल्या ” सहकारनामा ” या संदर्भ ग्रंथांची प्रत त्यांना भेटस्वरुपात देण्यात आली. कुबेर जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, आणि पुष्प गुच्छ देउन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बागलाण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश सोनवणे, अरुण भामरे, प्रकाश कोठावदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here