जळगांव (प्रतिनिधी क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : जामनेर तालुक्यातील पाळधी पासून एक किलोमीटर अंतरावर चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धड़केत तीन जण ठार झाल्याची घटना सोमवारी ३.१५ सुमारास घडली.
या भीषण अपघात दुचाकीवरील पंकज मोहन तायडे (वय ३२ रा. कला वसंत नगर. आसौदा रेल्वेगेट जळगांव) व धनंजय गंगाराम सपकाळे (वय ४२ रा. स्टेट बैंक कॉलनी जळगांव) तर चारचाकी चालक प्रवीण प्रकाश पाटिल (वय ३८ रा. भराडी, ता. जामनेर.) हे तीन जण ठार झाले आहे. शेंदुर्णी येथुन फार्च्यून फायनन्स या बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स पंकज तायडे हे दोन्ही ( एम.एच १९ डी. आर १४१९) यूनिकॉर्न या दुचाकीने बँकेचे कामकाज आटोपून जळगांवकडे परत येत असतांना जळगाहून पहूरकडे जाणाऱ्या चारचाकी ( एम.एच. १९ सियू ७१६१) ने दुचाकीला जोरदार धडक दिली.


पाळधीपासून एक किलोमीटर अंतरावर बळीराजा ढाबाजवळ हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की दूचाकीवरील पंकज तायडे व धनंजय सपकाळे तर चारचाकी चालकही जागीच ठार झाले. या प्रकरणी पहुर पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे. मयतांच्या नातेवाईकांनी जळगांव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी करत आक्रोश केला.






