12 वर्षानंतर भायखळयातील 6 रहिवाश्यांना मिळाली हक्काची सदनिका

गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड आणि अनिल गलगली यांनी न्याय मिळवून दिला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भायखळा येथील श्री लक्ष्मी रेसिडेंसी या म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या पुर्नविकास योजनेत 12 वर्षानंतर 6 रहिवाश्यांना हक्काची सदनिका मिळाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पुढाकार घेतला होता. गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड, आमदार यामिनी जाधव, तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आणि मुंबई दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी विशेष सहकार्य केले. गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी न्याय मिळवून दिला असल्याची भावना व्यक्त करत रहिवाश्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेत आभार मानले.

12 वर्षांपासून सदनिकेपासून वंचित असलेलं गणेश बाळ सराफ, नंदकिशोर जाधव, महेंद्र शाह, रमेश गायकवाड, प्रकाश बो-हाडे, प्रभाकर घारमळकर या रहिवाश्यांना नुकतेच हक्काची सदनिका विकासक क्षितिजा इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोसायटी तर्फे ताब्यात देण्यात आल्या आहेत. 12 वर्षानंतर भायखळा पश्चिम, ना.म.जोशी मार्ग, भायखळा येथील श्री लक्ष्मी रेसिडेंसी येथे हक्कांची सदनिका मिळाल्याबाबत या रहिवाश्यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड, आमदार यामिनी जाधव, एसव्हीआर श्रीनिवास, अनिल डिग्गीकर, अरुण डोंगरे आणि अनिल गलगली यांची भेट घेऊन आभार मानले.

anil-galgali

रहिवाश्यांनी आभार पत्रात उल्लेख केला आहे की अनिल गलगली यांनी कोठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सहकार्य केले. मागील 12 वर्षांपासून रखडलेला आमचा प्रश्न मार्गी लावला. पत्रात पुढे असे नमूद केले आहे की आपल्यामुळे आम्हां 6 रहिवाशांना न्याय मिळाला. नि:स्पृह भावनेने आपण केलेली मदत आम्ही कधीही विसरणार नाही. अनिल गलगली यांच्या पुढाकाराने गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रालयात बैठक आयोजित करत याबाबतीत दिलेल्या निर्देशानंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झाली आणि 6 रहिवाशांना न्याय मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here