केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सांगली शहरात काँग्रेसची सायकल यात्रा

कोल्हापूर (महाराष्ट्र प्रतिनिधी सतीश चव्हाण) : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. ही दरवाढ कमी करून सर्वसामान्य माणसांना न्याय द्यावा या मागणीसाठी सांगली शहर व ग्रामिण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, ग्रामिण जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, निरीक्षक संजय बालगुडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सांगली शहरातून सायकल यात्रा काढली

सायकल यात्रेची सुरुवात कर्मवीर भाउराव पाटील चौकातून झाली तेथून राम मंदिर, पंचमुखी मारुती रोड, मारूती चौक, बालाजी चौक, भारती विद्यापीठ मार्गे स्टेशन चौकातून ही यात्रा काढण्यात आली. मोदी सरकार पुन्हा नको, देशाच्या प्रगतीपुस्तकात मोदी सरकार नापास, बहुत हुई महंगाई की मार, अब उखाड फेकेंगे मोदी सरकार, देशकी जनता की एकही पुकार गद्दी छोडो मोदी सरकार अशा घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी ना. विश्वजीत कदम म्हणाले, केंद्रात बसलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात पेट्रोल आणि डिझेलचे दर १०५ ते १०७ रुपये प्रति लिटर झाले आहेत. गॅस ८०० ते ९०० रुपयांवर गेला आहे. अन्य जीवनावश्यक वस्तूही महागल्या आहेत. उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. केंद्राने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी करून लोकांना दिलासा द्यायला हवा होता, परंतु तो दिला नाही. त्यामुळे जनतेचा आक्रोश सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या महागाई विरुद्धचा लढा चालू केला आहे.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्यतेलाच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. भाजपाने आपल्या जाहिरनाम्यामध्ये 2014 ला असणारे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये भाववाढ करणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु पेट्रोल व डिझेल चे दर आता शंभरी पार झाले आहेत. याचा भाजप सरकारला जाब विचारणेसाठी ही सायकल यात्रा आहे.

sangli-congress
यावेळी पेट्रोल पंपावर सायकल रॅलीची सांगता वेळी युवक कॉंग्रेसच्या वतीने सह्यांची मोहीमीसे सुरूवात करण्यात आली. यावेळी पेट्रोल भरण्यास येणा-या नागरीकांच्या सह्या घेण्यात आल्या. तसेच ही सह्याची मोहिम सांगली जिल्ह्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर घेण्यात येणार आहेत. सायकल यात्रा आणि महिलांचे आंदोलन सातत्याने सुरू आहे.

यावेळी सायकल रॅलीत सांगली जिल्हा प्रभारी तौफिक मुलाणी, डॉ. जितेश कदम, सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी जयदीप शिंदे, बिपीन कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक, संजय मेंढे, अभिजित भोसले, संतोष पाटील अमर निंबाळकर, महेश साळुंखे, रविंद्र वळवडे, जि. प. सदस्य विशाल चौगुले, प्रमोद सुर्यवंशी, सनी धोतरे, तौफिक शिकलगार, अल्ताफ पेंढारी, अल्बर्ट सावर्डेकर, आयुब निशानदार, सागर काळे, आशिष चौधरी, राजेंद्र कांबळे, मौलाली वंटमोरे, पैगंबर शेख, देशभुषन पाटील, ताजोद्दिन शेख, मोईन जमादार, याकुब मनेर, शितल सदलगे, धनराज सातपुते, अनिकेत गायकवाड, सुरेश शिंदे, सलमान मेस्त्री, बाबगोंडा पाटील, मानिक कोलप, संदिप आडमुठे, प्रशांत देशमुख, अशोक रासकर, मालन मोहिते, टिपू बारगीर, विनोद बुरूड, श्रीनाथ देवकर, योगेश जाधव, अमोल पाटील, संतोष भोसले, संभाजी पाटील, चंदू सरगर, राहूल गायकवाड, भारती भगत, दिलीप धोतरे, मयुरेश पेडणेकर, आयुब पटेल, समिर मुजावर, पवन महाजन, सुहेल बलबंड, सौरभ पाटील, समीर मुजावर, स्वप्नील मिरजे, अलंकार जाधव, मोहम्मद शेख, शैलेश शेजाळ, गौरव गायकवाड, सिद्धार्थ सुर्यवंशी, जोएल जाधव, प्रशांत अहिवळे, अमित पारेकर, ओंकार कांबळे आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here