मुंबई (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्र राज्य एज्युकेशन बोर्डाचा इयत्ता दहावीचा म्हणजेच एसएससीचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत रेकॉर्डब्रेक निकाल लागत ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातून १५ लाख७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे गुण शाळांकडून मिळाले, त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे.
यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आणि निकाल जाहीर करण्यात आला.
या परीक्षेतील एकूण विद्यार्थी – १७ लाख ६५ हजार ८९८ होते तर १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी – ९९.९५ टक्के झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ४.६५ टक्के वाढ झाली असून, त्यात कोकण विभाग अव्वल आला असून, या विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
संपूर्ण परिक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असून, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. मात्र संपूर्ण निकालात यंदाही मुलींचीच बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण परिक्षेत केवळ ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे.
विभागनिहाय टक्केवारीचा विचार करता कोकण – १०० टक्के, पुणे- ९९.९६ टक्के, नागपूर – ९९.८४ टक्के, औरंगाबाद – ९९.९६ टक्के, मुंबई- ९९.९६ टक्के, कोल्हापूर -९९.९२ टक्के, अमरावती – ९९.९८ टक्के, नाशिक – ९९.९६ टक्के, लातूर – ९९.९६ टक्के असा निकाल आहे.
या लिंकवर निकाल उपलब्ध –
http://http://result.mh-ssc.ac.in






