नवी दिल्ली : टेनिसच्या चाहत्यांच्यादृष्टीने सद्यस्थितीत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट टेनिस स्टार नोवाक जोकोविच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार की नाही? आता या प्रश्नाचे उत्तर स्वतः जोकोविचने दिले आहे. आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याची माहिती गुरुवारी नोवाक जोकोविचने ट्विटरवर दिली.
Cannot disappoint my little friend Koujirou. I booked my flight for Tokyo and will proudly be joining #TeamSerbia for the Olympics. 🇷🇸 pic.twitter.com/23TmSdvc4x
— Novak Djokovic (@DjokerNole) July 15, 2021
जोकोविचने एक ट्विट केले असून या ट्विटच्या माध्यमातून आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. जोकोविचने ट्विटमध्ये लिहिले आहे की, टोकियो ऑलिम्पिकसाठी मी विमानाचे तिकिट बुक केले आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी टीम सर्बियामध्ये मी गर्वाने सहभागी होणार आहे. जोकोविचने आणखी एक ट्विट करत लिहिले की, मोठ्या गर्वाने मी टोकियो ऑलिम्पिकसाठी सामना बांधायला घेतले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या सामन्यांमध्ये पदक जिंकण्यासाठी आपल्या राष्ट्रीय संघासोबत भागीदारी करणार आहे. सर्बियासाठी खेळणे माझ्यासाठी नेहमीच आनंददायी आणि प्रेरणादायी ठरले आहे. मी सर्वांना आनंद देण्यासाठी आणि उत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्याला जायला हवे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली आहे. म्हणजेच, यंदा ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच पार पडणार आहे. तसेच खेळाडूंच्या स्टाफची संख्याही कमी करण्यात आली आहे. यासर्व कारणांमुळे जोकोविचच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. अशातच आता स्वतः जोकोविचने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.






