समुद्र खवळला : मरिन ड्राइव्ह येथे आज उंच लाटा उसळल्या

सायन, वडाळा परिसरात पाणी साचण्यास सुरुवात

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : गेल्या दोन तीन दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत केले आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यानुसार आज सकाळपासून मुंबई, उपनगर व वसई-विरार भागात वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्र खवळला; मरिन ड्राइव्ह येथे आज उंच लाटा उसळल्या

मुंबईः चेंबूरमध्ये मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचले; पाण्यातून मार्ग काढण्यात अडचणी

मुंबईः सायन, वडाळा परिसरात पाणी साचण्यास सुरुवात

पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांत पुढील ३ दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here