अमेरिकेचे अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ले

तालिबानला इशारा देवून केलेल्या कारवाईत तालिबानची ठिकाणे उद्धवस्त

काबूल : अफगाणिस्तानचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तालिबानला अमेरिकन हवाई दलाने झटका दिला. अमेरिकन हवाई दल आणि ड्रोनने तालिबानच्या ठिकाणांवर हल्ले केले. अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने याला दुजोरा दिला आहे. सैन्य माघारीनंतर अमेरिकेने तालिबानवर केलेला हा पहिला हवाई हल्ला आहे. तालिबानने हिंसाचार न थांबवल्यास हवाई हल्ला करणार असल्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे.

वृत्तसंस्था ‘एपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने अफगाण सैन्याच्या मदतीसाठी हे हवाई हल्ले केले. अफगाण सैन्य मागील काही दिवसांपासून तालिबानसोबत युद्ध करत आहे. या हवाई हल्ल्याच्या एक दिवसाआधीच अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवत असल्याचे म्हटले होते. तालिबानने जवळपास निम्म्या अफगाणिस्तानचा ताबा घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, मागील ३० दिवसात अमेरिकेने जवळपास सहा-सात हवाई हल्ले केले आहेत. अफगाणिस्तानमधून जवळपास ९५ टक्के अमेरिकन सैन्य माघारी गेले आहे. पुढील महिन्यात सर्व सैन्य अमेरिकेत परतणार असल्याची घोषणा याआधी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here