जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्र प्रदेश सकल मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष अँड.बापूसाहेब जाधव यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र सचिव रवींद्र धुमाळ कोल्हापूर यांनी जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी धरणगाव येथील मराठा समाजाचे प्रथम नगराध्यक्ष पदाचे मानकरी पी एम पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सकल मराठा समाज यांच्या तर्फे धरणगाव नगर परिषद येथे धरणगाव शहर व ग्रामीण परिसरातून मराठा समाजाच्या वतीने पाटील सरांचा शाल श्रीफळ बुके देवुन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निलेशभाऊ चौधरी नगराध्यक्ष धरणगाव हे उपस्थित होते. प्रबोधिनीचे धनराज गुरुजी व अध्यक्ष डॉ डी पी पाटील,संचालक चंदन पाटील हे उपस्थित होते.या प्रसंगी मूकबधिर विद्यालय यांच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वृंद यांनी सत्कार केला. तसेच लांडगे गल्लीतर्फे प्रकाश पाटील,अशोक देशमुख,प्रकाश जाधव,कैलास पाटील,माधव पाटील यांनी सत्कार केला.

यशवंत पतपेढीतर्फे महेशभाऊ पवार यांनी पाटील सरांचा सत्कार केला. मराठा पंच मंडळातर्फे गुलाब मराठे,नामदेव मराठे,मच्छिंद्र पाटील,ईश्वर पाटील यांनी पाटील सरांच्या सत्कार केला. पाटील समाज पंच मंडळातर्फे भीमराज पाटील,गोपाल पाटील,मंगेश पाटील,योगेश पी.पाटील यांनी सत्कार केला.मेडिकल असोसिएशनतर्फे डॉ.धनंजय पाटील, महेश पाटील,सुहास पाटील यांनी पाटील सरांचा सत्कार केला. तसेच पथराड येथील लोकमतचे वार्ताहर भगवान मराठे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी महेश पवार यांची संजय गांधी निराधार समिती यांची निवड झाल्याबदल व सुहास पाटील यांची मेडिकल असोसिएशन कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्यावतीने यांच्या सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






