पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणी चार कर्मचारीच बनले मुख्य साक्षीदार

उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : पॉर्न चित्रपट निर्मिती आणि अॅप्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे. या प्रकरणाला आता नवीन वळण लागलं असून, कंपनीतील चार कर्मचारीच या प्रकरणात मुख्य साक्षीदार म्हणून समोर आले आहेत. मुंबई पोलिसांतील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रांना अटक केली. या अटकेनंतर मोठी खळबळ उडाली. राज कुंद्रा हेच या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. यासंबंधीचे पुरावेही मिळाले असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. गुन्हे शाखा पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला आहे. तसंच विआन आणि दुसऱ्या कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडतीही घेतली आहे. या कार्यालयात पोलिसांना एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर आता मुंबई पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणात राज कुंद्रा यांचेच चार कर्मचारी मुख्य साक्षीदार म्हणून समोर आले आहेत. राज कुंद्रा आणि इतर आरोपी चौकशीत पुरेसं सहकार्य करत नाहीये. मात्र, आता कंपनीतीलच चार कर्मचारी मुख्य साक्षीदार बनण्यास तयार आहेत. हे चार कर्मचारी या प्रकरणात महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणातील महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असं सूत्रांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here