लोकसभेत कागदपत्रांची फेकाफेक
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस होता. प्रचंड गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज १२.३० वाजेपर्यंत स्थगितही करण्यात आले होते. दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी कागदपत्र फाडून फेकाफेक करत, घोषणाबाजी देखील केली. तसेच, खेला होबे असे देखील नारे देण्यात आले.
पेगॅसस, कोरोना आदी मुद्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तर, काँग्रेससह १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला घेरण्याची व दबाव निर्माण करण्याची रणनिती आखली आहे. आज दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठ्याप्रमाणावर गोंधळ घालत संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे दिसून आले.
Rajya Sabha adjourned till 2 pm over uproar by Opposition MPs, demanding a discussion over the 'Pegasus Project' report https://t.co/rS5wPYzQrB pic.twitter.com/hLQNMl9oKy
— ANI (@ANI) July 28, 2021
पेगॅसस हेरगिरी प्रकरणानरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांचे नेते पंतप्रधान व गृहमंत्र्यांना जाब विचारत आहे. तर, सरकारचे म्हणणे आहे की विरोधकांची सभागृहाचे कामकाज चालू देण्याची किंवा चर्चा करण्याची इच्छा नाही. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधींनी सांगितले की, पेगॅसस हेरगिरी प्रकरणी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, याप्रकरणी १४ पक्षांकडून नोटीस दिली जाईल.






