पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंचघर गावातील प्रभूवाडी व महाड या भागाला पूराचा बसल्याने त्यांना सावरण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. यात कोथरुड पुणे येथील तरुण व भजनीमंडळीतर्फेही मदतीचा हात देण्यात आला आहे.
या पूरग्रस्त भागातील कुटुंबाना कोथरुड पुणे येथील तरुण व भजनी मंडळींतर्फे या वेळी पूरग्रस्त कुटुंबांना कपडे, साड्या ,बिस्कीट पुडे,सॅनिटरी पॅड, पाणी बॉटल व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी नवचेतना युवा मंच व ग्रामीण विकास संस्था पुणेचे अध्यक्ष जयवंत दहिभाते तसेच सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पासलकर, प्रतिक झाडके, गणेश सावळे, सागर वाघ चंद्रकांत धुमाळ, गोणते, बलकवडे व सूर्यकांत कडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांतर्फे सूर्यकांत कडू यांनी आभार मानले.






