‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फिटनेसची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा; व्हिडीओ झाला व्हायरल

फिटनेससाठीची मेहनत पाहून भल्याभल्यांना फुटला घाम

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : मराठमोळ्या अभिनेत्रीमध्ये फिटनेसबाबत फारशी जागृती नसते मात्र मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून भल्या भल्यांना घाम फुटत आहे. तसेच सोशल मीडियावर सध्या तिच्या फिटनेसची जोरदार चर्चा आणि सोबतचं कौतुकदेखील होतं आहे.

सोनाली सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. लॉकडाऊनमुळे बरेच दिवस शुटींग बंद असल्याने सर्व कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या होते. सोनाली कुलकर्णीसुद्धा आपल्या सोशल मीडियावरून सतत फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना आपल्या खास अपडेट होती. तसेच यादरम्यान ती आपल्या पतीसोबत दुबईमध्ये होती. आणि तेथे राहून ती आपल्या फिटनेसवर लक्ष देत होती. आत्ता ती मायदेशी परतली आहे.

परत येताच तिने शुटींगलादेखील सुरुवात केली आहे. मात्र यासर्व व्यापात तिने आपलं वर्कआउट अजिबात मिस होऊ दिलं नाहीय. वर्कआउटच्या वेळ ती कटाक्षाने पाळत आहे. (नुकताच सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेयर केला आहे.यामध्ये ती जिममध्ये असल्याचं दिसत आहे. शिवाय ती एका खांबाला लटकून अगदी हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. हा एबीएस वर्कआउट आहे. सोनालीचा हा खटाटोप एब्ससाठी चालला आहे.

काही दिवसांपूर्वीचं सोनालीने एक पोस्ट शेयर करत, आपण ३ महिन्यांत ५ किलो वजन कमी केल्याचं सांगितलं होतं. आणि आनंदही व्यक्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here