राज कुंद्राच्या अडचणीत वाढ : ५१ पॉर्न फिल्म पोलिसांच्या हाती

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : पॉर्न फिल्म प्रकरणी शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात आहेत. राज कुंद्रा आणि त्याचा मित्र रायन थोरपे यांना गेल्या महिन्यातच मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि हॉटशॉट ॲप्सवर अपलोड करण्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणात एक जबरदस्त खुलासा समोर आला आहे.

राज कुंद्रा आणि रियाब थोरपे हे व्हॉट्‌स ऍप ग्रुप आणि चॅट डिलीट करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मुंबई क्राईम ब्रॅंचने ५१ पॉर्न फिल्म जप्त केल्या आहेत, अशी माहिती सरकारी वकीलांनी उच्च न्यायालयात दिली आहे.

वकील अरुणा पै यांनी व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाला सांगितले की, राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांच्यावर अश्लील सामग्री प्रवाहित केल्याचा आरोप आहे. यासह, पोलिसांनी फोन आणि स्टोरेज उपकरणांमधून सामग्री जप्त केली आहे. अरुणा पुढे म्हणाली की, राज कुंद्राला त्याच्या हॉटशॉट ॲपवर लंडनमध्ये कंपनीचे मालक असलेले त्यांचे मेहुणे प्रदीप बक्षी यांच्यासोबत ईमेल संदेश होता.

राज कुंद्रा १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याबद्दल आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. त्याच्या व्हॉट्सॲप चॅटवरून हे देखील उघड झाले की राजने २०२३ पर्यंत आपल्या कंपनीचे ध्येय ठेवले होते आणि त्या काळात त्याला सुमारे ३४ कोटी रुपयांचा नफा कमवायचा होता. त्याचबरोबर पोलीस या संपूर्ण प्रकरणात राज कुंद्राला मुख्य सूत्रधार मानत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here