नवी दिल्ली : मैत्री दिन सर्वत्र साजरा केला जात असतांना, या दिनाचे औचित्य साधत राहुल गांधी यांनी एक खास व्हिडीओ शेअर सोशल मिडीयावर शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अवघ्या काही तासातच हजारो लोकांनी लाईक केलेल्या या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अदानी, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत असतात.
काही दिवसांपूर्वी राहुल यांनी कोरोना लसीकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘कुठे आहे लस?’ असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला सवाल विचारुन देशातील कोरोना लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि मीडियातील बातमीचा उल्लेख करत एक व्हिडिओही राहुल यांनी शेअर केला होता.






