नेतृत्वांचा गुणांचा खजाना असलेला कृतिशील सामाजिक कार्यकर्ता – सुभाषभाऊ सांखला

(संपादक सुनिल पाटील)
‘सुस्वभावीपणा, कुवतीनुसार दानी वृत्ती, समाजसेवेची प्रचंड आवड असेलेला ध्येयवादी कार्यकर्ता या विचारसूत्राने चांगल्या समाजसेवेची गुढी उभी राहते आणि स्व. काकाश्री सागरमलजी सांखलाच्या मुशीत तयार झालेले सुभाषभाऊ सांखलानी देखील सामाजिक कार्याचा वसा घेतला ते एक ‘वजनदार’ व मदतीसाठी हाकेला ओ देऊन धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्हावासीयांना अाेळख अाहे. समाजहितैषी उपक्रम राबवत असताना त्याचा दिंडाेरा न पिटणे, अध्यात्मासह कला, साहित्य संस्कृती ,खेळ, सामाजिक संवर्धनासाठीच्या पूरक उपक्रमात फुल नव्हे तर फुलाची पाकळी म्हणून सेवा पुरवणे ही त्यांची भाववैशिष्ट्ये आहेत. ‘काळ धावताे आहे ताे धावतच असताे. पूर्वी ताे सस्यांच्या पावलांनी धावत हाेता ताे आज राफेल विमानांबराेबर हवेतून पुढे चालला आहे’, या विधानाची परिचिती त्यांना भेटल्यावर आपसूकच येते. गतिमान कालचक्राचा वेध घेऊन स्वत: ‘आधुनिक’ हाेण्याला प्राधान्य दिले आहे.
व्यवसायात त्यांनी मितभाषीपणा, तंत्रशुद्धपणे ग्राहकांशी संवाद साधून वेगळा ठसा उमटवला आहे. जैन धर्माचे आध्यात्मिक श्रध्दास्थान भगवान महावीरावर त्यांची नितांत श्रद्धा आहे व्यवसायात स्थिरस्थावर असले तरी त्यांच्या वागण्यात, बाेलण्यात कुठेच अहंकाराचा दर्प जाणवत नाही. कोणी कितीही शत्रूता दाखवली तरी त्यांच्याशी सकारात्मकतेने (पॉझिटिव्ह थिंकीगने ) आपलेसे केले स्पष्ट बोलतांना मतभेद झाले तरी त्यांनी मनभेद ठेवले नाही
सदर लेख लिहिण्याचा प्रपंच म्हणजे सुभाषभाऊचे कार्य हे नवयुवकांना प्रेरणादायी आहे सुभाषभाऊनी विविध संस्थाच्या माध्यमातून सेवा केली त्यात इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून दररोज ३००० फूड पॉकिटचे वितरण केले तसेच अरसिनिक अलब्म ३० गोळ्यांचे तीन लाख ओषधीच्या डबी जिल्ह्याभरात वाटप केल्या त्यांच्या समाजकार्याचे उद्धिष्ट लक्षात घेऊन इंडियन रेड क्रॉस सोसायटीने आपत्ती व्यवस्थापन प्रमुख बनविले तसेच या कार्याची दखल घेत स्टार रिपोर्ट मॅगझीनचे संपादक व हिरा व्यापारी हार्दिकभाई हुंडिया यांनी सुभाषभाऊंना कोरोना योद्धा खिताब देऊन गौरविण्यात आले जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निर्भीडपणे लढा देत असतात सामन्य जनतेच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र परिश्रम झटत असल्याने भाऊ अल्पवधीतच अन्याय विरोधी जनजागृती मंचाचे प्रदेशअध्यक्ष झाले
नागरिकांच्या सुख, दु:खाच्या प्रसंगांना हजेरी लावणे, एखाद्याने समर्पित भावनेने सेवाभावी उपक्रम राबवला असेल तर त्याच्याशी संपर्क साधून शुभेच्छा देणे, एखाद्या विषयावर काय चांगलं अन‌् काय वाईट हे तर्कशुद्धपणे शाेधून प्रतिक्रिया नाेंदवणे, जाती-पातीच्या भिंती जमिनदाेस्त करून सामाजिक समरसता प्रस्थापित करणे यात तर त्यांचा हातखंडा आहे. सुभाष भाऊंनी अण्णा साहेब सागरमलजी सांखला क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून जनतेला अर्थ पुरवठा केला व त्याद्वारे सभासदांच्या विकासाला हातभार लागला संस्थेकडून दरवर्षी आर्थिक दूर्भल घटकांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत असते तसेच समाजातील जळगाव शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भोजन व निवासाची सोय करून देणाऱ्या कानजी शिवजी जैन बोर्डिंग मध्ये सुद्धा सुभाष भाऊ विशस्त म्हणून कार्यरत आहेत ओसवाल सुख शांती संचलित सांखला / लुंकड ओसवाल मंगल कार्यालयाचे उपाध्यक्ष आहेत जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे कार्यकारणी सद्स्य आहे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे कार्यकारी सद्स्य आहेत
‘माणूस हा समाजशील प्राणी आहे, आपल्या संस्कृतीत समष्टीचं म्हणजे समाजाचं ऋण फेडणं हे एक कर्तव्य मानलं जातं. हे सर्व साधण्यासाठी मेंदूच्या क्षमतेला मानसिक सामर्थ्याची जाेड द्यावी लागते. यालाच इंग्रजीत ‘लीडरशिप क्वाॅलिटी’ किंवा नेतृत्वाची क्षमता अस्संखलीत प्रकर्षाने जाणवते ती सुभाषभाऊं मध्येच….!
– लतीश जैन (पत्रकार)
मोबाईल नंबर — 9850246861

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here