सुरक्षा दलांनी श्रीनगर-जम्मू हायवेवर हल्ल्याचा कट उधळला; एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर (ऑल इंडिया उपसंपादक रंजन चौधरी) : सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा श्रीनगर-जम्मू हायवेवर हल्ल्याचा कट उधळला. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर १५ तास सुरक्षा दल व दहशतवाद्यांत चकमक चालली. या चकमकीत एका पाकिस्तान दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे.

घटनास्थळावरून रॉकेट लाँचर्ससह मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुलगाम जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू महामार्गावर गुरुवारी दोन दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर बेछुट गोळीबार सुरू केला. यानंतर सुरू चकमक सुरू झाली. चकमकीत एक जवान आणि दोन नागरिक जखमी झाले.

बारामुला-श्रीनगर रोड किंवा काझीगुंड-पांथा चौकाच्या ठिकाणी हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट होता. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिस आणि सुरक्षा दलांचे जवान सतर्क होते. प्रत्युत्तरात दाखल केलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावला, असं आयजी विजय कुमार यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here