स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांची कारवाई; चार जणांकडून ५५ पिस्तुलांसह ५० काडतूस जप्त

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन दिवसांवर आला असताना दिल्लीच्या स्पेशल सेलने टाकलेल्या छाप्यात मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. पोलिसांनी आंतरराज्य शस्त्रतस्करी करणाऱ्या आरोपींकडून मोबाईल फोन, सीम कार्डही जप्त केले आहे.

स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ५५ पिस्तूल आणि ५० जिवंत काडतूस जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. राजवीर सिंह, धीर, विनोद आणि धर्मेंद्र अशी आरोपींची नावे आहेत.

अटकेतील आरोपीपैकी एकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याची सध्या पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. दुसरा आरोपी हा कुप्रसिद्ध कौशल गँगमधील आहे. हा आरोपी हरियाणा आणि दिल्लीमधील दोन खून प्रकरणात मोस्ट वाँटेड आहे. राजबीर आणि धीरज यांना बुरारी येथे 7 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी विनोदला नझफगड येथून 9 ऑगस्ट आणि धर्मेंद्रला द्वारका येथून शुक्रवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here