घरफोडी करण्यासाठी चोरीची वाहने वापरणाऱ्या दोन गुन्हेगारांस पोलिसांकडून अटक 

पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : खांदेश्वर पोलिसांनी चार चाकी वाहने चोरून त्याद्वारे घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांस चोरीच्या चार वाहनांसह ताब्यात घेतले आहे. सुनिलसिंग गुलाबसिंग दुधानी (वय-24) व जयकिशन छबीराज गौर (वय-22)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींच नावे असून या दोन्ही आरोपींवर विविध पोलिस ठाण्यांतर्गत सात गुन्हे दाखल आहेत

खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवीन पनवेल से.-१३ मधून  ईको गाडीची चोरी झाल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात  करण्यात आली होती. गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ती गाडी महात्मा फुले चौक पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी करण्यासाठी वापरून त्यानंतर कल्याण येथे ती गाडी  सोडून दिली होती.

परिमंडळ- 2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहा पोलिस आयुक्त भागवत सोनावणे , खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वपोनि देवीदास सोनावणे व गुन्हे पोलिस निरीक्षक डि.डि. ढाकणे  यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकातील सपोनि प्रविण पांडे, पो. उपनिरीक्षक निलेश पोळ, पोहवा महेश कांबळे, सुदर्शन सारंग, चेतन घोरपडे, पो.ना. नवनाथ लवटे, विशाल घोसाळकर, पोशि सचिन सरघर, चेतन वळवी, संभाजी गाडे आदींचे पथक यासंदर्भात शोध घेत असताना आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशीत त्यांच्याकडून साडे सहा लाख रूपये किंमतीच्या चार गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. यांच्या अटकेमुळे वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here