बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या तीस-पस्तीस खेड्यातील शेतकऱ्यांच्या गुरांच्या संपर्क येत असल्यामुळे मागील काही महिन्यापासून गुरांची कोणत्याही प्रकारची औषधे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना पायपीट व चक्रावर चकरा मारण्याची वेळ आली आहे.
हा दवाखाना नुसता नावापुरताच राहिला आहे या दवाखान्यातील डॉक्टर शेतकऱ्यांना खाजगी मेडिकल मधून गोळ्या.औषधी आणण्यास भाग पाडत आहे शेतकऱ्यांना मेडिकलमधील महागड्या महागड्या .गोळ्या औषधी आपल्या गुरांच्या उपचारासाठी परवडत नसल्याने जिल्हा परिषद पशुवैद्यकीय प्रशासनाने लवकरात लवकर गूराच्या.गोळ्या औषधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी बाजार सावंगी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे







