पिस्तुलच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटणारे तिघे अटकेत

जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : रात्रीच्या वेळी घरी जात असलेल्या होटल चालकाच्या खिशातील ४० हजार रुपयांची रोकड पिस्तुलच्या चाख दाखवत जबरीने लुटणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रातोरात अटक करण्यात यश मिळाला आहे.

१७ ऑगस्टच्या रात्री ९:३० सुमारास महाबळ कॉलनीजीक बाहेती शाळेजवळ सदर घटना घडली होती. गणेश दुलाराम महाजन यांची जळगावच्या नविन बस स्थानक परिसरात होटल आहे १७ ऑगस्ट रोजी रात्रि होटलचे कामकाज आटोपुन ते आपल्या ताब्यातील दुचाकी महाबळ परिसरातील गाडगेबाबा नगरच्या दिशेने जात होते. दरम्यान वाटेत बाहेती शाळेजवळ ट्रिपलसीट चालवणा- या बुलेटस्वाराने त्यांना ओव्हरटेक करत त्यांची वाट अडवली. त्यातील, अरबाज दाऊद पिंजारी नावच्या इसमला गणेश महाजन ओळखत होते. इतर दोघे मात्र त्यांना परिचीत नव्हते.

pistol-japt

तिघे बुलेटच्या खाली उतरले व त्यानी गणेश महाजन देखील दुचाकीवरुन खाली उतरण्यास भाग पाडले त्यातील अरबाज पिंजरी, याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तुल काढत गणेश महाजन यांना घाबरवणयास सुरवात केली. ईतर दोघांने महाजन यांना चल पैसे काढ तुझ्याजवळ किती पैसे आहेत असे म्हणतात धमकावण्यास सुरवात केली. गणेश महाजन यांना नकार दिला अस्ता त्यातील एकाने थेट त्यांचा खिशातील अंदाजे ४० हजार रुपयांची रोकड जबरिने काढुन घेतली. पोलीसात तक्रार दिल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यास तिघे विसरले नाही त्यानंतर तिघे बुलेटने पसार झाले, या सर्व प्रकारामुळे भेदरलेल्या गणेश महाजन यांनी काही वेळाने रामानंद नगर पुलिस स्टेशन गाठत रितसर फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा रामानंद नगर पोलिस स्टेशनला, गु.र. न. २४१/२१ भा.द.वी. ३९२,५०४,५०६, ३४ तसेच आर्म अॅक्ट ३/२५ अनुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि, किरण कुमार बकाले, यांच्या पथकातील यांना सुरु केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here