मुंबई (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : खान्देशाचे नाव जगाच्या नकाशावर पोहचविणारी कल्याणी पाटील ही खान्देशकन्या अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये वैमानिक झाल्याने, आज खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीदिनी, बहिणाबाईंना अभिवादन करताना कल्याणीचेही सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कल्याणीने अत्यंत जिद्दीने अमेरिकेत आपले वैमानिक शिक्षण पूर्ण करून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळाला आहे. यासोबतच तिने २५० तासांचे उड्डाण पूर्ण केले आहे. पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्रिंपी येथील मुळ रहिवासी कैलास पाटील व मोहिनी पाटील यांची कन्या कल्याणी पाटील हिची ही यशस्वी वाटचाल जिल्ह्यासाठी मान उंचावणारी आहे. कल्याणी हिने नुकताच अमेरिकेत पायलट प्रशिक्षण पूर्ण केले असून १ सप्टेंबरला अमेरिकेतील एअरलाईनमध्ये ती जॉईन होत आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही वडिलांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखविला. तो विश्वास सार्थ ठरवत, मी ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम घेतले. म्हणून स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वानी कठोर परिश्रम घ्या, यश हे हमखास मिळते, असे मत वैमानिक कल्याणी पाटील हिने बुलंद पोलिस टाइम्सशी बोलताना तिने सांगितले.






