महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार : ग्रामपंचायत बरखास्त झाल्यास जबाबदार कोण असा थेट प्रश्न ग्रामपंचायत सदस्यांनी केला उपस्थित
बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : खुलताबाद तालुक्यातील कनकशीळ इंदापूर ग्रुप ग्रामपंचायतीला औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावली आहे सदरील पत्रात निवडणूक खर्च वेळेच्या आज सादर न केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आली आहेत
ग्रामपंचायत सदस्य संजय निकम यांनी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना एका निवेदनाद्वारे सदरील निवडणूक खर्च वेळेच्या आत आपल्या कार्यालयात सादर केला आहेत सादरीकरण केलेल्या कॉपी देण्यात आली आहेत ग्रामपंचायत सदस्य संदीप निकम यांनी वेळेच्या आत निवडणूक खर्च सादर केलेला असेल तर ग्रामपंचायत बरखास्त झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा फटका आम्हाला बसत आहे कारण आम्ही निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया करून निवडणूक लढवली आहे व वेळेच्या आत निवडणूक खर्च प्रशासनाला सादर केला आहेत तर महसूल प्रशासनाने योग्यता तपासून निर्णय दिला नाही तर महसूल प्रशासनाच्या विरोधात आम्ही याचिका दाखल करुन
हे निवेदन ग्रामपंचायत सदस्य संदीप किसनराव कामठे वाघ अनिल दिपचंद शोभाबाई शाईनाथ बोडके काशीबाई बाबुराव निकम सुधाकर पोफळे काशीबाई आबाराव म्हस्के सविता अरुण जाने विमलबाई विठ्ठल कामठे संदीप देवनाथ निकम सोमीनाथ काशिनाथ भालेराव कंचन योगेश निकम प्रदीप देवनाथ निकम आशाबाई सुदाम निकम यांनी तहसीलदार खुलताबाद व जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना दिले आहे.






