‘शेतकऱ्यांचं सरळ डोकं फोडायचं’; कलेक्टर आयुष सिन्हांचा व्हिडीओ व्हायरल

हरियाणा (प्रदेश उपसंपादक नंद पाल): केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब हरियाणा भागातील शेतकरी आंदोलन करत आहेत, याच पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर कर्नाल जिल्ह्यात पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी हे शेतकरी विविध ठिकाणांवर रास्ता रोको आंदोलन करत होते.

पोलिसांच्या या लाठीहल्ल्यात दहाजण जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे, मात्र या घटनेतील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा हल्ला पुर्वनियोजित असल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे.

या व्हिडीओमध्ये कलेक्टर आयुष सिन्हा पोलिस कर्मचाऱ्यांना म्हणतात की, “बॅरिकेट्स ओलांडून कुणीही आत यायचा प्रयत्न केला तर सरळ त्याचं डोकं फोडायचं, कोणताही संकोच करायचं नाही. मी ड्यूटी मॅजिस्ट्रेट आहे. हे आदेश मी लिखित स्वरुपात देतोय.” आयुष सिन्हा पुढे म्हणतात की, “आम्ही पुर्ण रात्रभर झोपलो नाही, दोन दिवस झालं ड्युटी करतोय. या रेषेच्या पलिकडे एकही व्यक्ती गेला नाही पाहिजे. आणि जर गेलाच तर त्याचं डोकं फुटालेलं असायला हवं. प्रत्येकाला पकडून सरळ त्याचं डोकं फोडायचं.” ही दृश्य कॅमेरात कैद झाल्याने आयुष सिन्हांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here