धुळे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा धुळे महापालिका अधिकारी व कर्मचार्यांतर्फे आज निषेध व्यक्त करण्यात आला.
मनपाच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन काळी फिती लावून आंदोलन करण्यात आले. तसेच दोन तास लेखणीबंद आंदोलन देखील करण्यात आले. याबाबत मनपा अधिकारी, कर्मचारी यांच्यातर्फे आयुक्त अजित शेख यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी, श्रीमती शिल्पा नाईक, सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, पल्लवी शिरसाठ, अभियंता कैलाश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, नगर सचिव मनोज वाघ, बळवंत रनाळकर, किशोर सुडके, कार्यालयीन अधीक्षक रमजान अन्सारी, प्रसाद जाधव, कामगार नेते सुनील देवरे तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक व सर्व कनिष्ठ अभियंता, अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.






