मुंबई (प्रतिनिधी) : येथील विशेष व्याधिग्रस्त मुलींसाठी कार्यरत डिझायर सोसायटी या संस्थेमध्ये वेद फाउंडेशन द्वारा, माझे आवडते चित्र या कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कला स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या बालिकांना वेद फाउंडेशन अध्यक्ष श्री स्वप्नील राणी नंदकुमार यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित सदर स्पर्धा, अनुजा बागेश्वर, सयोनी तुपे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली असून नुकतेच या स्पर्धेचे निकाल जाहिर करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये ग्रीष्मा बोरे, झीनत शेख, शैनाज शेख, आराधना चव्हाण, रीना केवत, पूजा हनुमंता, शबनम खान, लता नदार, साक्षी पुजारी, मनीषा हाती इत्यादी व्याधीग्रस्त बालिकांनी सहभाग नोंदविला. सदर उपक्रमांमुळे मुलींमधील कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांच्या विचारांना गती प्राप्त होते असे मत स्वप्नील यांनी यावेळी व्यक्त केले.






