चोपडा मतदारसंघात लवकरच दुसऱ्या आश्रमशाळेचे भूमिपूजन करणार

विष्णापूर आश्रमशाळा इमारत भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ना.गुलाबरावजी पाटील यांचे सुतोवाच

चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : आज आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या मंजूर झालेल्या विष्णापूर ता.चोपडा जि. जळगाव येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम (किंमत रु.१४.०० कोटी) चे भुमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले

या प्रसंगी आमदार सौ.लताताई सोनवणे,माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळिराम सोनवणे शिवसेना सह संपर्क प्रमुख रावेर मतदार संघ, जिल्हा प्रमुख समाधान महाजनसर यांची प्रमुख उपस्थितीत होती.

vishrampur-aasharmshala

अध्यक्षीय भाषणात बोलतांना पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांनी भविष्यात चोपडा मतदारसंघात विविध विकासकामे होणार असून यात लवकरच आणखी एका आश्रमशाळा इमारत भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सुतोवाच काढले. तसेच या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने लाभलेली उपस्थितीमुळे संपूर्ण चोपडा शिवसेनामय झाल्याचे दिसून येत होते.

नारायण राणे यांची हिंमत असेल तर जळगावमध्ये जाहीर सभा घेऊन दाखवावी गुलाबराव पाटील यांचे जाहीर आव्हान, विष्णापूर येथील शासकीय आश्रम शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमात गरजले चोपडा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची हिम्मत असेल तर त्यांनी जळगाव मध्ये येऊन जाहीर सभा घेऊन दाखवावी असा सूचक वजा इशाराच महाराष्ट्राचे पाणीपुरवठामंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या विष्णापूर या गावामध्ये १४ कोटी रुपयांच्या आश्रम शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले.

यावेळी जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर, चोपडा तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, यावल तालुका प्रमुख रविद्र सोनवणे, भुसावळ तालुका प्रमुख सुभाष चौधरी, महिला तालुका प्रमुख मंगलाताई पाटील, जि.प.सदस्य हरीश पाटील, माजी उप सभापती एम.व्ही.पाटील सर, रवी भाऊ चव्हाण, किशोर पाटील, माजी सभापती माणिकबापू महाजन, ए.के.गंभीरसर, नगरसेविका मीनाताई शिरसाठ, नगरसेवक महेंद्र धनगर, राजाराम पाटील, किशोर चौधरी, प्रकाश दादा राजपूत, भैय्या पवार, नामदेव पाटील, अडावद सरपंच भावनाताई माळी, गलंगी सरपंच शीतल देवराज आदी उपस्थित होते

gulabrao-patil

यावेळी व्यासपीठावर आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, चोपडा तालुका महिला प्रमुख मंगला पाटील, विष्णापूरच्या सरपंच सखुबाई भिल्ल, माजी सरपंच प्रताप पावरा, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री एम व्ही. पाटील, जि प सदस्य हरीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बिटवा, शहरप्रमुख आबा देशमुख, अडावदच्या सरपंच भावना माळी,मीना शिरसाठ, तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी श्री बी. एस. कोसोदे आदिवासी विभागाचे उप अभियंता श्री एस डी पाटील माजी उपनगराध्यक्ष तथा चोप्रा विधानसभेचे संपर्कप्रमुख विकास पाटील, यावल चे शिवसेना प्रमुख रवींद्र सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई एकही गावात जाऊ देणार नाही चोपडा तालुक्यात ३५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना देण्यात आली आहे. मागील काळातील सरकारची आणि आमच्या सरकारची तुलना केली तर निश्चित विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here