आझमगड (उत्तरप्रदेश) : येथे एका खासगी रुग्णालयात कंपाऊंडरनेच २५ वर्षीय महिला रुग्णावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपाऊंडरला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आझमगड येथील एका नर्सिग होममध्ये ६ सप्टेंबरला सर्दी, तापामुळे उपचारासाठी पीडितेला भरती करण्यात आले होते. त्यानंतर रात्री कंपाऊंडरने तिच्या सोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याचे पीडितेने सांगितले, तर पीडितेच्या पतीच्या म्हणण्यानुसार पत्नीसोबत कंपाऊंडर रात्री अत्याचार करत होता. मला जाग आल्याचे कळताच कंपाऊंडर तेथून पळाला. दरम्यान पतीने आरडाओरडा सुरु केल्यामुळे हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांची याबाबत कळवण्यात आले. पोलिसांनी तिथे येऊन कंपाऊंडरला ताब्यात घेतले.
दरम्यान, आझमगडचे एसपी सुधीर सिंह म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून कंपाऊंडर तेथे कामाला आहे. पीडितेने कंपाऊंडरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.घटनेवेळी पीडितेचा पतीदेखील त्याच खोलीत झोपला होता त्यामुळे त्याचीदेखील चौकशी केली जाणार आहे. सत्य लवकरच समोर येईल असे त्यांनी सांगितले.






