विसर्जनासाठी गेलेल्या तीन सख्या बहिणींसह सात मुली बुडाल्या

लातेहार (झारखंड) : जिल्ह्यातील करमा येथे विसर्जनासाठी गेलेल्या सात मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन सख्या बहिणींसह त्यांच्या चार मैत्रिणींचाही समावेश आहे.

शुक्रवारी रात्री गावात करमा पुजा संपन्न झाल्यानंतर गावातील लोक करमा विसर्जन करण्यासाठी तळ्याजवळ गेले होते. यावेळी तळ्यात उतरलेल्या सात मुली पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्या. महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर गावकऱ्यांनी तळ्यात उड्या घेत मुलींना बाहेर काढले. मात्र यातील तिघींचा घटनास्थळीत मृत्यू झाला तर अन्य चार मुलींना घेऊन कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रेखा कुमारी, लक्ष्मी कुमारी, रीना कुमारी, मीना कुमारी, पिंकी कुमारी, सुषमा कुमारी आणि सुनिता कुमारी अशी मृत मुलींची नावे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु: ख व्यक्त केले आहे. लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून तरुणींनी जीव गमावल्याचा धक्का बसला. दु:खाच्या या क्षणी, शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना, असे ट्वीट मोदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here