छत्तीसगड : येथे माजी मंत्री आणि भाजप नेते राजिंदरपाल सिंह भाटिया यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाटिया चौरिया भागात आपल्या लहान भावासोबत राहत होते. रविवारी राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
भाटिया हे राजनंदगावच्या खुज्जी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते. २००३ ते २००८ दरम्यान ते राज्याचे परिवहन मंत्रीही होती. भाटिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनातून बरेही झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. भाटिया यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.






