शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष शिवाजी(भाऊ) गोंदकर यांची श्री साईबाबा संस्थान विश्वस्तपदी नुकतीच निवड झाली त्या अनुषंगाने आज हेडगेवार नगर मधील रहिवाशांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता
त्यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जेष्ठ नेते हिरामण नाना वारुळे, सुभाषजी जाखडी,बाळासाहेब कोळपकर आदी उपस्थित होते यावेळी जेष्ठ नेते रमेश बीडये,मा नगरसेवक मच्छीन्द्र वारुळे,भाजपा शहर उपाध्यक्ष दीपक वारुळे,किशोर भणगे,आण्णा भोईर,अविनाश सोनवणे, बाळासाहेब जाधव,सुरेश मुळे,नारायण बरदे,अक्षय मुळे, सुभाष यादगुडे, कुणाल वारुळे, सुनील वेलनगर,रफिक मंसुरी, सागर कुमट,आकाश वाडेकर,रामदास बरदे,प्रकाश भालेराव, बंटी हरळे,आदींसह कुणाल वारुळे, उमेश देशमुख, नागेश वरडोळे, उल्हास गलांडे, परेश जपे, सुरेश वारुळे,शाम कुलकर्णी, दिगंबर वाडेकर, सुरेश लाडे, मंगेश लाडे,सोमु पाठक,विजय महाजन, नंदू कुलथे, रावसाहेब भालेराव, बाळासाहेब भालेराव, अरविंद भाई पटेल,रमेश मुळे, साई जगताप, रशीद मंसुरी,साई बडगुजर, ऍड अमोल बिडवे, स्वप्नील वामन,मुकेश जानी, ज्ञानेश्वर नकादे,प्रकाश क्षीरसागर, बाळासाहेब कदम,गणेश भालके, गणेश कोळपकर, राजेंद्र कोळपकर, सतिष कुंभकर्ण, मयूर काळे, अभिजित नागपूरे,गणेश सुपेकर, किशोर कोरटे, परवेझ दमानिया,मंगेश वाडेकर,सागर वाडेकर, अरुण वाडेकर,नलु सारंगधर, केदार साने,अनवर शेख, अमोल गुरव, कालिदास डंबाळे,आदींसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

याप्रसंगी नागरिकांनी नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर यांनी हेडगेवारनगर मध्ये केलेल्या विविध विकास कामांबाबत शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण नाना वारुळे,दिपक वारुळे, सुरेश मुळे, सोनालीताई खेडेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले, या सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर म्हणाले की, मा ना राधाकृष्ण विखे पाटील व मा खा डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगर पंचायतने विविध विकास कामे पूर्ण केली असून अजूनही इतर प्रलंबित कामे सध्या जोमात सुरू आहेत ,नागरिकांच्या सहकार्याने आज शिर्डी स्वच्छ व सुंदर झाली आहे,त्रिकोणातील भव्य असे बाबांचे शिल्प,जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम ,नवीन भाजी मंडई, रस्ते व चौक सुशोभीकरण अशा विविध प्रकारची कामे प्रगतीपथावर आहेत,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर भणगे यांनी केले, हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी समस्त हेडगेवारनगर मधील सर्वच नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.






