नाशिक येथे छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच आरोपीने केली मारहाण

police-marhan
संग्रहित फोटो

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच चक्क आरोपीनेच मारहाण करण्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, महिलांची छेडछाड केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. विशेष म्हणजे ही तक्रार पोलिस हवालदार सागर जगन्नाथ जाधव यांनी दिली होती. तक्रारीचा तपास करण्यासाठी पोलिस संत कबीरनगर झोपडपट्टीत भागात गेले. याप्रकरणी पोलिसांनी अजय घुले या संशयिताला पूर्वीच अटक केली आहे. त्याच्या सांगण्यावरून संशयित महेश कटारिया याच्यावरही सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतच्या पुढील तपास करण्यासाठी पोलिसांनी कटारिया याचे घर गाठले. तेव्हा त्याने जोरजोरात आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना जमा केले. त्याची आई, बहीण आणि मित्रांना बोलवतांना एक महिला यावेळी डिझेलची कॅन घेऊन आली. पोलिसांशी सुरु असलेल्या झटापटीत आरोपीने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी पुढे होत डिझेलची कॅन हातात घ्यायचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाच मारहाण सुरू केली.

फिर्यादी असणारे पोलीस हवालदार सागर गुंजाळ व पथकातील कर्मचाऱ्यांना त्याने चापटाने मारहाण केली. गलिच्छ शिवीगाळ केली. शिवाय त्यांना धमकीही दिली. त्यामुळे पोलिसांनी गंगापूर पोलिस ठाण्यात महेश कटारियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here