नाशिक (विशेष प्रतिनिधी) : शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपये असलेली बॅग लुटली. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम नेवदराम दियालानी (रा. टागोनगर) यांनी शनिवारी दुपारी आपली कार (एम. एच.१५ ईआर ३१३३) शालिमार भागातील सांगली बँक सिग्नल परिसरातील जगन्नाथ रेस्टॉरंटसमोर उभी केली होती. तेव्हा चोरट्याने या कारची काच फोडली. चालकाच्या सीटवर असलेली बॅग लंपास केली.
या बॅगेमध्ये अडीच लाखांची रक्कम आणि महत्त्वाची कागपदत्रे होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.






