महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघातर्फे कुबेर जाधव यांना राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात कोल्हापूर येथे २५ संप्टेबर रोजी मान्यवरांच्या हस्ते कुबेर जाधव यांना सहकार भूषण पुरस्कार गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येवून , सन्मानित करण्यात आले.

वसंतदादा सहकारी साखर कारखान्यात ३५ वर्षांपासून निरंतर साखर कारखान्यात प्रामाणिक पणे अभियंता म्हणून कार्यरत राहुल कारखान्यातील कामगार,सभासद ,उस उत्पादकांचे हीत जोपासत असताना शेतकऱ्यांचे पंचप्राण कै ,शरद जोशी यांनी उभि केलेली शेतकरी संघटनेची चळवळ आजही ,मा खा राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सहकार क्षेत्र टीकावे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखाने वाचव्हावेत ते गैरव्यवहार व भ्रष्टाचारामुळे बंद पडत असताना ते पुन्हा सुरू व्हावेत व कामगार सभासद यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी सतत डोळ्यात तेल घालून लक्ष घालून लक्ष देत असल्याने ,व सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे बारकाईने अभ्यास करून महाविद्यालयीन जनतेला सहकार क्षेत्र समजावे म्हणून ” सहकारणामा ” या संदर्भ ग्रंथांची निर्मिती केली आहे , त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने पुन्हा एकदा सुरू व्हावेत म्हणून कायम पाठपुरावा करून लक्ष वेधून घेत असतात.

sarpanch-seva-sangh

यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक कलाकार, तसेच कोरोणा महामारीत जिवाची पर्वा न करता सतत डोळ्यात तेल घालून काम करणारे सेवक, डॉ क्टर, पोलिस, अधिकारी, यांना ” कोव्हिड योब्दा” म्हणून गौरविण्यात आले, महाराष्ट्रातील २०, हजार ग्रामपंचायती मध्ये ग्राम विकासाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कामे केली जात आहेत , यातील भरीव अशी कामगिरी करणाऱ्या संरपंच , ग्रामसेवकांचा शोध घेवून त्यांना सन्मानित करण्यात आले कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने शानदार सोहळ्यात सर्व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पावसे, स्वागत अध्यक्ष शंकरराव खेमनर, विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब मरगळे, सरचिटणीस बाबासाहेब पावसे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here