सामोडे (प्रतिनिधी) : साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण १०० टक्के भरल्याने साईबाबा पाणी वाटप संस्थेचे चेअरमन दिलीप घरटे यांनी जलपुजन केले. लाटीपाडा धरण उशिरा का होईना पण 100 टक्के भरल्याने परीसरातील शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला असून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाणी मिळेल.
यावर्षी धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने लाटीपाडा धरण भरले मात्र डावा कालवा दुरूस्त करून पोटचार्या गेट साईपिन दुरूस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पाटबंधारे विभागाने त्वरित दुरूस्तीसाठी प्रयत्न करावा जेणेकरून शेतकर्यांना रब्बी हंगामात पाणी व्यवस्थित शेवटच्या शेतात पर्यंत मिळेल परीसरात पाऊस कमी झाल्याने अजून विहीरीना पाणी आले नाही.
सर्व काही लाटीपाडा धरण्याचा पाण्यावर अवलंबून आहे जर दुरूस्त ची काम लवकर सुरू करण्याची मागणी सामोडे येथील भाजपा सहकार आघाडी पिंपळनेर मंडळ अध्यक्ष व साईबाबा पाणी वाटप संस्था चे चेअरमन दिलीप घरटे यांनी केली आहे.






