जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांच्या मार्फत शहरात विविध ठिकाणी सॅनिटायझेशन

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे मार्फत जळगावातील कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील जनमत प्रतिष्ठान व कुणाल संजय जडे यांच्याकडून विविध ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचा उपक्रम सुरु आहे.
आज (दि.६) जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांनी शहरातील संपूर्ण कलेक्टर ऑफिस सॅनिटायझेशन करण्यात आले. त्याप्रसंगी सहकार्य म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील, कलेक्टर ऑफिसचे श्री.मोरे, श्री.बेंडाळे, शिक्षक भारती संघटनेच्या अध्यक्ष शितल ताई जडे, कुणाल जडे, हर्षाली पाटील, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व कुणाल जडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आभारपत्र
कलेक्टर ऑफ़िस मध्ये जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व कुणाल जडे या दोघानी कोविडचा नायनाट होईपर्यंत कलेक्टर ऑफ़िस समाजसेवी हेतूने निःशुल्क सेनिटाईज करण्याचा निश्चय केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्याना आज (दि.६) कलेक्टर ऑफ़िसमधून आभारपत्र देण्यात आले. त्यांच्या कार्याची प्रशासनीक पातळीवर दखल घेतली गेल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here