पुणे (प्रतिनिधी) : जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरास मुस्लीम राष्ट्रीय मंच चा विरोध असून या विरोधात कडक भूमिका घेण्याचा इशारा मंचाचे राज्य अध्यक्ष अली दारूवाला यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दिकी यांच्या अटके नंतर पुण्यातील २२ संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या बुधवारी निदर्शने करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंच ने या प्रकरणाचा निषेध केला आहे. कोणत्याही परिस्थिती मध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्याची भूमिका आम्ही मान्य करणार नाही, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रदेशाध्यक्ष अली दारूवाला यांनी सांगितले .
या प्रकरणी निदर्शने करण्यासाठी परवानगी मागितली असताना ती मिळाली नाही. त्यामुळे बुधवारी तीन वाजता त्यांच्या सोलापूर रस्त्यावरील कार्यालयात ते पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.






