मुंबै बँकेने दाखल केला एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बदनामी केल्याप्रकरणी मुंबै बँकेने उच्च न्यायालयात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

मुंबै बँक राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक असून आर्थिक उलाढाल दिवसोंदिवस वाढत आहे. बँकेच्या या लौकिकाला काळिमा फासण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. त्यामुळे बँकेची बदनामी होत असून त्याचा व्यवसायावर परिणाम होतो. त्याची गंभीर दखल घेत बँकेने एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक देविदास कदम यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या होणाऱया बदनामीबाबत सभासदांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा ठराव मंजूर केल्याची माहिती कदम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here